Search
Sign In

सुपारी

सुपारी

अलिबाग कोकण म्हटले कि समोर दिसतात नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागा. कोकणची शान म्हणजे ह्या बागा , वाड्या. पोफळी म्हणजेच सुपारीचे झाड. सरळ उंच साधारणतः ३० ते ४० फुटापर्यंत लांब आणि वर हिरवागार डोलारा, त्या हिरव्यागार डोलाऱ्यातून डोकावणाऱ्या पिवळ्याशार सुपारीचे घड. कोकणात प्रतेय्क घराच्या आजूबाजूला तसेच मागील वाडीमध्ये हमखास दिसणारे हे झाड. सुपारीला मध्यमप्रतीची, चुनखडीयुक्त जमीन आणि आर्द्रतायुक्त थंड हवामान पोषक असून हे पीक अलिबाग श्रीवर्धन व मुरुड तालुक्यात जास्त प्रमाणात घेतले जाते. सुपारीचे रोप तयार करण्यासाठी मोठ्या सुपाऱ्या निवडून भुसभुशीत जमिनीत २ इंच खोलवर पुरतात, एक वर्षाचे रोप ६० x ६० सेमी च्या खड्ड्यात शेणखत व रासायनिक खटाचे योग्य प्रमाणात मिश्रण घालून लावतात. साधारणतः सुपारी आणि नारळाची झाडे एकत्रपणे थोडे थोडे (२ मीटर) अंतर ठेवून लावली जातात. सुपारीचे झाड नारळाच्या झाडाएवढेच उंच असले तरी खोड रुंदीने कमी असते व पानांच्या डोलारा सुद्धा थोडा कमी असतो नारळाप्रमाणेच वर्षभर सुपारीचे उत्पादन मिळते.

सुपारीचे झाड दिसायला जितके सुंदर तितकेच सुपारीचे विविध उपयोग. खायच्या पानामध्ये सुपारी हा अविभाज्य घटक. एवढेच नाही तर पूजा पाठ व धार्मिक कार्यांमध्ये सुद्धा सुपारीचे महत्व फार मोठे आहे. आपल्याला सुपारीचे हे उपयोग माहिती आहेत परंतु सुपारीचे औषधी गुणधर्म सुद्धा बरेच आहेत व योग्य उपयोग केल्यास बऱ्याच प्रमाणात फायदा होऊ शकतो.

अलिबाग आणि परिसरात सुपारीचे बऱ्याच प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबाग ते मुरुड या पट्यात सुपारीचे पीक जास्त प्रमाणात घेतात. आणि म्हणून येथील व्यापारास चालना मिळावी म्हणून सुपारी संघ येथे बऱ्याच प्रमाणात आढळून येतात. या संघांमध्ये परिसरातील सुपारी गोळा केली जाते व येथून मुंबई व इतर शहरांना पुरविली जाते. येथील हवामान सुपारीसाठी फार उपयुक्त असल्यामुळे येथे उत्तम प्रतीची सुपारी पिकवली जाते.

येथे पूर्वी बऱ्याच घरांमध्ये खायच्या पानाचे ताट किंवा पेटी असायची त्यात घरची सुपारी व घरचीच खायची पाने. मग घरातील वयस्कर माणसे जेवण झाले कि पण खायला बसायचे. सुपारी फोडायला अडकित्ता असायचा. अशी कि सुपारी कोकणातील घराघरात पोचलेली.

हल्लीच्या काळात सुपारी बऱ्याच प्रमाणात खाद्यपदार्थामध्ये वापरतात, तसेच तिचे औषधी गुणधर्म विचारात घेतले तर – तोंड येण्याची समस्या, पोटातील कृमी, प्रवासात उलटी होणे, दात दुखी ची समस्या, अशा खूप तक्रारी सुपारीच्या साहाय्याने कमी होतात.

शास्त्रीय नाव – Areca catechu

प्रचलित नाव – Betel nut , सुपारी

हंगाम – १२ महिने

उपयोग – धार्मिक कार्ये, खायचे पान मध्ये, पान सुपारी,

वैद्यकीय वापर – तोंड येण्याची समस्या, पोटातील कृमी, प्रवासात उलटी होणे, दात दुखी ची समस्या,

  • 554
  • Farming
  • Comments Off on सुपारी

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password