Search
Sign In

नारळ

नारळ

अलिबाग कोकण म्हटले कि समोर दिसतात नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागा. कोकणची शान म्हणजे ह्या बागा. सरळ उंच वाढत जाणारे व वरच्या बाजूला शानदार हिरवागार डोलारा. व त्या डोलाऱ्यातून लगडलेली नारळाची पेंड. बारा महिने झाडाला बहर आलेला. कोकणातील प्रत्येक जेवणात न चुकता वापर होणारा. प्रत्येक धार्मिक कार्यात वापरले जाणारे श्रीफळ.

नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर वेगळा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात हि श्रीफळ वाढवूनच केली जाते. शहाळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीरास फारच उपयुक्त असते. शहाळ्याचे पाणी म्हणजे मूत्रविकारांवर प्रभावी औषध. शरीराला थंडावा देण्यास शहाळ्याच्या पाण्याचा फार उपयोग होतो. नारळाचे खोबरे जेवणात वापरले जाते. कोकणातील प्रसिद्ध चवदार असे उकडीचे मोदक – याला सुद्धा नारळाचे ओले खोबरे वापरले जाते. नारळाच्या पानांचा म्हणजेच झाप किंवा झावळी चा उपयोग गावाकडे घराच्या अंगणात छप्पर म्हणून सुद्धा वापरले जाते. झापांचा व खोडाचा जळण म्हणून सुद्धा वापर होतो.

नारळ पाडणे म्हणजे एक जिकिरीचे व साहसाचे काम असते. काही विशिष्ट लोक हे काम त्यांचा रोजचा व्यवसाय म्हणून करतात. दोरीच्या साहाय्याने पूर्ण ३०-४- फूट झाडावर चढतात व त्यांच्या चाणाक्ष नजरेने शहाळी व नारळ ओळखून पाडले जातात. नारळ सोलणे हे सुद्धा मेहनतीचे व जिकिरीचे काम असते. पण हल्ली एका प्रकारच्या मशीन च्या साहाय्याने हे नारळ सोलणे सोपे झाले आहे.

पावसाळ्यानंतर नारळी पौर्णिमेला कोळी समाज समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारीला सुरुवात करतात. होळीच्या दिवशी होळीमध्ये टाकलेला नारळ हाताने काढणे हा सुद्धा धाडसी खेळ खेळला जातो (यासाठी प्रचंड सरावाची आवशक्यता असते त्यामुळे असा प्रयत्न कोणी करू नये.) पोपटी च्या शेंगा खाताना सोबत ओला नारळाचे खोबरे असेल तर पोपटीची रंगत  काही औरच.

नारळाचे विविध प्रकार अलिबागमध्ये प्रसिद्ध आहेत.  

गावठी नारळ – हे झाड फार उंच वाढते व या झाडाला आयुष्य सुद्धा फार जास्त असते. हा नारळ आकाराने मोठा असून आतील खोबरे सुद्धा जाड असते.

सिंगापुरी नारळ – हे झाड उंचीने लहान असतानाच याला नारळ येतात. या शहाळ्याचे पाणी फार गॉड असते.

देवगड ऑरेंज –  हा नारळ बाहेरून दिसायला केशरी रंगाचा असतो.

मोहाचा नारळ  –  कोकणातला नारळाचा हा दुर्मिळ प्रकार, सहसा फार माहित नसलेला. साध्या नारळासारखा हा नारळ असतो. झाड सुद्धा दिसायला इतर नारळाप्रमाणेच. याझदाच्या नारळापैकी फक्त काही नारळाचं एक विशिस्ट गॉड चवीचे असतात. हे नारळ सहसा जेवणात वापरात नाहीत. याचे खोबरे सध्या नारळाच्या खोबऱ्यापेक्षा फार जात गॉड असते. जेव्हा असा नारळ गोड सापडतो तेव्हा तो नारळ उतरला असे म्हटले जाते. आणि असा समाज आहे कि हा नारळ कोयतीच्या एक घावात फुटला तर तो उतरण्याचे प्रमाण जास्त असते.  

शास्त्रीय नाव – Cocos nucifera

प्रचलित नाव  – Coconut , नारळ   

हंगाम  – वर्षभर

उपयोग –  धार्मिक कार्ये, जेवणात, खाण्यासाठी, मूत्रविकारांवर औषध, शक्तिवर्धक पेय

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password