Search
Sign In

कलिंगड

कलिंगड

उन्हाळ्याच्या दिवसात कोणालाही खावेसे वाटणारे फळ म्हणजे कलिंगड. आतून लालभडक, रसाळ व गोड असे कलिंगड, लहानथोरांपासून वयस्कर असे सर्वांचेच आवडते. भरपूर प्रमाणात पाणी या बऱ्याच प्रमाणात पोषक तत्वे असल्याने उन्हाळ्यातील शरीराची झालेली पाण्याची कमतरता भरून काढायला मदत होते तसेच कितीही खाल्ले तरी अपाय होत नसल्यामुळे सर्वांचेच आवडते व घराघरात खाल्ले जाणारे हे आवडते फळ. अलिबागच्या जवळपासच्या खेड्यापाड्यांमध्ये याचे प्रचंड प्रमाणात पीक घेतले जाते.

 

बाहेरून हिरवे गर्द असणारे कलिंगड उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात विकायला येतात. अलिबाग ते पनवेल रस्त्याला लागून कलिंगडाची बरीच दुकाने दिसतात. मोठ्या गावठी कलिंगडांसोबत आकाराने लहान असलेली शुगर बेबी कलिंगड सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत. अलिबाग परिसरात दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर आणि विशेष करून पाहुण्यांसाठी नक्की कलिंगड कापले जाते. अलिबागच्या प्रसिद्ध पोपटी सोबत तर कलिंगडाची हवेच.

 

असे हे सर्वांचे आवडते कलिंगड खायला जितके मधुर रसाळ तितकेच त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहेत. शरीरातील  पाण्याचे प्रमाण चांगले ठेवणे, यात पोषक आणि फायदेशीर वनस्पती संयुगे यात समाविष्टीत आहेत, कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करणारी संयुगे यात असतात, याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते,  अशी बरीच औषधी गुणधर्मे यात समाविष्ट आहेत. असे हे बहुगुणी रसाळ व मधुर अलिबागचे कलिंगड.

औषधी गुणधर्मे – 

  • तुम्हाला हायड्रेट करण्यास मदत करते
  • पोषक आणि फायदेशीर वनस्पती संयुगे समाविष्टीत आहे
  • कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करणारी संयुगे असतात
  • हृदयाचे आरोग्य सुधारू शकते
  • जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होऊ शकतो
  • मॅक्युलर डिजनरेशन रोखण्यास मदत करू शकते
  • स्नायूंच्या दुखण्यापासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते
  • त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे

शास्त्रीय नाव – Citrullus lanatus

प्रचलित नाव  – Watermelon , कलिंगड  

हंगाम  – उन्हाळा

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password