Search
Sign In

सोलकढी

सोलकढी

कोकणातील सुप्रसिद्ध सोलकढी !!!

आंबट गोड, लालभडक कोकम पहिले कि तोंडाला पाणी सुटते. अश्याच ताज्या कोकमाची सोलकढी म्हणजे निखळ स्वाद. आरोग्यपूर्ण, चवदार, आकर्षक गुलाबी रंगाची सोलकढी, त्यावर कोथिंबीर पेरलेली – अशी हि कोकणातली सोलकढी हल्ली खूपच प्रसिद्ध झाली आहे. शाकाहारी असो व मांसाहारी, एकदा भरपेट जेवले कि १-२ वाट्या सोलकढी प्यायची म्हणजे जेवण हमखास लवकर पचते.

कोकणातील जेवणाचे भरलेल्या ताटाला पूर्णत्व देण्याचे काम सोलकढी करते. आणि हि सोलकढी काही नुसती शोभेसाठी नसते तर तिचे फायदेही तेवढेच असतात.

सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अँटिऑक्सिडेन्ट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम इत्यादी घटक मुबलक असतात. त्याचसोबत कॅलरी वाढवणारे, अनावश्यक फॅट्स किंवा कोलेस्ट्रेरॉल वाढण्याचा धोका कमी असतो. अँटिऑक्सिडेन्ट घटक रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास फयदेशीर असतात. डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे जेवणानंतर सोलकढीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे.

अशी हि बहुगुणी, चवदार, थंडगार, सोलकढीचा आस्वाद घ्यायला विसरू नका

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password