Search
Sign In

Black Currant

Black Currant

करवंद किंवा डोंगरची मैना. काळेभोर छोट्याश्या आकाराचे व आतून लालभडक असलेले गोड फळ म्हणजे कोकणचा मेवा. उन्हाळ्याच्या दिवसात डोंगराळ भागात हमखास करवंदाची जाळी दिसतात, त्यावर हिरव्या रंगाची कच्ची तर काळ्या रंगाची पिकलेली करवंदे पाहायला व तोडायला काही भलताच आनंद. काटेरी हिरवेगार असलेले हे घनदाट झुडूप डोंगराळ भागात जास्त करून आढळते, तसेच बऱ्याच ठिकाणी शेताच्या बांधावरसुद्धा आढळून येते.

कच्ची करवंदे मीठासोबत खायला फार मजा येते. याचे लोणचे सुद्धा बनवले जाते. नाहीतर मधोमध कापून त्याला तेल व मीठ लावून चटपटीत करमट जेवणात फार छान लागते. पिकलेल्या करवंदाची गोडी काही अवीटच. उन्हाळ्यात बाजारात वाट्यावर हमखास मिळणारी करवंदे खवय्यांचे लक्ष वेधून घेतात. लहानपणी घरातील भावंडे समोर करवंदे घेऊन बसत व खेळ खेळत – एक एक करवंद चावून पाहायचे लाल असेल तर कोंबडा, फिके लाल असेल तर कोंबडी- ज्याची जास्त करवंदे लाल तो जिंकला. आजकालच्या मोबाईल च्या युगात हे गमतीशीर खेळ हरवले आहेत. पण करवंदाची गोडी अजूनही तशीच…. त्यामुळे उन्हाळ्यात बाजारात करवंदे घेण्याचा मोह आवरणे कठीण.

  • 192
  • Fruits
  • Comments Off on Black Currant

Sign In AlibagOnline – Market Place

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password