Search
Sign In

शिवळ्यांचा एकशिपी रस्सा

शिवळ्यांचा एकशिपी रस्सा

अलिबागच्या समुद्रातील तसेच आजूबाजूच्या खाडीपरिसरामध्ये सापडणाऱ्या शिवल्या म्हणजेच शिंप्या. मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या शिवळ्या इतर ठिकाणी फारश्या सापडत नाही. शिवळ्यांचे बरेच पदार्थ बनवता येतात त्यातील एक म्हणजे एकशिपी रस्सा.

साहित्य – एक वाडगाभर स्वच्छ धुतलेल्या शिवळ्या, दोन शेकटाच्या शेंगा (अलिबाग ला शेवग्याच्या शेंगांना शेकटाच्या शेंगा असे म्हणतात), एक बटाटा , दोन कांदे, एक इंच आल्याचा तुकडा, ८ ते १० लसूणच्या पाकळ्या, अर्धी वाटी सुके खोबरे, थोडी चिंच, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद , हिंग, अलिबागचा घरगुती मसाला, गरम मसाला.

कृती –   प्रथम शिवळ्या विळीवर कापून घ्याव्यात. कापताना गोळा एका शिपीमध्ये घेऊन दुसरी रिकामी शिंपी टाकून द्यावी. नंतर एका पातेलीमध्ये तेल गरम करून त्यात बारीक ठेचलेले आले, लसूण व बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा साधारणतः गुलाबी झाल्यावर त्यात थोडे हिंग, चिमूटभर हळद, एक छोटा चमचा गरम मसाला, २ छोटे चमचे घरगुती मसाला घालून मिश्रण चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये कापलेल्या एकशिपी , शेकटाच्या शेंगा, चिरलेला बटाटा , व थोडे पाणी घालून परतावे. बटाटा शिजल्यावर त्यामध्ये थोडा चिंचेचा कोळ घालावा. चिंच नसल्यास २,३ आमसूल टाकावेत. एक उकळी आल्यावर गॅस मंद करून भाजलेले सुके खोबरे व भाजलेला कांदा यांचे वाटण घालून पाच मिनिटानंतर गॅस बंद करावा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवावे . झाला शिवळ्यांचा एकशिपी रस्सा तयार.

शिवळ्यांचा एकशिपी रस्सा गरम गरम भातावर आणि सोबत भाजलेले उडीदाचे पापड घेऊन खाल्यास फार चवदार लागतो. सोबत न विसरता अलिबागचा पांढरा कांदा घ्यावा.

सौजन्य – सौ. सीमा म्हात्रे

  • 223
  • Sea-Food Recipes
  • Comments Off on शिवळ्यांचा एकशिपी रस्सा

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password