चौल नाक्यावरून श्री दत्तमंदिराकडे जाताना डाव्या बाजूला एका छोट्याश्या टेकडीवर एक गोल घुमटसदृश रचना दिसते. हा घुमट चौकोनी आकाराचा असून प्रत्येक बाजूला तीन कमानी आहेत. ह्या सर्व कमानी दगडांनी बंद केलेल्या आहेत. दोन बाजूंच्या मधील कमानी उघड्या असून त्यातून आतमध्ये जात येते. हि मशीद असावी असे काहींचे मत आहे. गॅझेट मधील माहितीनुसार हा एक इस्लामिक पद्धतीचा मकबरा आहे. १५१४ साली बार्बोसाने लिहिलेल्या नोंदीनुसार सराई गावाच्या आसपासच्या भागात मोठी जत्रा भरत होती असे दिसते.
ह्या बुरूजाजवळून आजूबाजूला बऱ्याच दूरवर नजर जाते. पश्चिमेकडे कोर्लईचा किल्ला दिसतो, तसेच रेवदंड्याचा गडकोट सुद्धा याच दिशेला आहे. उंच माडाच्या व सुपारीच्या झाडांमुळे आता रेवदंड्याचा किल्ला नीट दिसत नाही. उत्तरेकडे श्री दत्त मंदिराची टेकडी दिसते. आणि त्याच्या उजवीकडे हिंगुलजा देवीचे मंदिर सुद्धा दिसते. हि दोन्ही मंदिरे फार प्राचीन काळापासून आहेत.
हि टेकडी आता वन विभागाकडे असून येथे छोटेखाली उद्यान सुद्धा बनवले आहे.
जवळची ठिकाणे –
कसे पोहोचाल –
- अलिबागपासून अंतर – १८ कि. मी.
- मुंबई ते अलिबाग – १०० कि. मी.
- पुणे ते अलिबाग – १४५ कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे