मांडवा जेट्टी –
मुंबईहून अलिबागला समुद्रमार्गे यायचे असल्यास मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे यावे लागते नंतर मांडवा येथून रस्त्याने अलिबाग ला पोहोचता येते. मांडवा जेट्टी हि काही वर्षांपूर्वी अतिशय छोटे बंदर होते व काही निवडक बोटी येथे लागत. पण गेल्या काही वर्षांमध्ये या जेट्टीचा फार मोठा विस्तार झाला आहे. अलीकडेच भारतामधील सर्वात पहिली मोठी रो-रो सेवा सुद्धा सुरु झाली आहे.
वाहतूक –
मांडवा जेट्टी मधून फार पूर्वीपासून मुंबई ते मांडावा अशी प्रवासी वाहतूक चालू आहे. मुंबई ते अलिबाग अशा प्रवाशी सेवा देणाऱ्या बऱ्याच संस्था येथे कार्यरत आहेत. अलीकडेच येथे मुंबई ते अलिबाग अशी रो -रो सेवा सुरु झाली आहे. अलिबाग ते मुंबई हे साधारणतः ३ तासाचे रस्त्याचे अंतर समुद्रमार्गे अवघे ९० मिनिटांचे झाले आहे. रो-रो सेवेमुळे कार आणि मोठ्या गाड्या सुद्धा समुद्रमार्गे येऊ शकतात. बरेच नोकरदार मंडळी रोज या मार्गे ये-जा करत असतात. पावसाळ्यात मात्र हि सेवा खराब हवामानामुळे बंद असते. येथे नव्याने प्रशस्त वाहनतळ सुद्धा तयार केले आहे.
Popup Dinning Restaurant –
मुंबईहून तुम्ही जेट्टी वर उतरलात कि तुमचे स्वागत करतात येथील विविध प्रकारची रेस्टॉरंट्स आणि छोटी छोटी दुकाने. येथे नव्याने उभारलेली Popup Dinning Restaurants हे नवीन आकर्षण पर्यटकांना आणि प्रवाश्यांना आकर्षित करतात.
जवळील आकर्षण –
मांडवा जेट्टी जवळच एक जुना टेहळणी बुरुज आहे.
जेट्टीमधून बाहेर पडल्यावर समुद्रकिनारी जात येते.
ह्या परिसरात मोठ्या हिरव्यागार नारळी पोफळीच्या बागा आहेत, आजूबाजूला अनेक सिनेकलाकार, खेळाडू तसेच बऱ्याच धनिकांचे बंगले आहेत.