Search
Sign In

अलिबागची मिठागरे

अलिबागची मिठागरे

अलिबागला लाभलेला अथांग समुद्र आणि ह्या समुद्राने दिलेले नैसर्गिक वरदान म्हणजेच मत्स्य व्यवसाय, जल वाहतूक आणि आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा घटक म्हणजे मीठ. प्राचीन काळापासून शेतीनंतर मीठ उत्पादन हा मोठा व्यवसाय होता. शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये सुद्धा हा मोठा उद्योग असल्याचे दिसून येते. पोर्तुगीज अमलाखालील गोव्यातील स्पर्धेमुळे या उद्योगावर विपरीत परिणाम झाल्यामुळे महाराजांनी आयात मिठावर मोठी जकात बसवून स्थानिक मिठास संरक्षण दिले. पेशवे काळात उरण, पेण, नागोठणे, पनवेल हि महत्वाची मीठ उद्योग केंद्रे होती. खाड्यांच्या काठची जमीनीची धूप होऊ नये म्हणून १७५५ – १७८० च्या कालावधीत बांधबंदिस्ती घालून तयार झालेल्या अशा जमिनी भात लागवड आणि मीठ उत्पादनासाठी वापरल्या गेल्या. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवले जाते हे तर सर्वश्रुत आहेच, पण ते कसे व कुठे बनवले जाते ह्याचा आढावा AlibagOnline च्या टीम ने घेतला.

बनविण्याची प्रक्रिया :-

अलिबागच्या परिसरात पेण जवळील वडखळ येथे, तसेच मुरुड च्या पुढे मिठागर या गावामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठी मिठागरे दिसतात. हा व्यवसाय पिढ्यानुपिढ्यांपासून चालत आलेला व जोपासलेला आहे. समुद्राला जोडलेल्या खाडीच्या पाण्याचा उपयौग येथे केला जातो. साहजिकच खाडीला लागूनच हि मिठागरे दिसून येतात. मिठागरे बनविताना मोठ्या आकाराचे वाफे बनवले जातात, या वाफ्यातील जमीन आधी ठोकून ठोकून कडक बनविली जाते, नंतरच ह्यामध्ये पाणी सोडले जाते. समुद्राचे पाणी एकदा वाफ्यामध्ये आले कि वाफ्याचे तोंड बंद केले जाते. नंतर आतील पाण्याची वाफ होऊन मीठ तयार होऊ लागते. वाफ्यामधील पूर्ण पाणी आटून गेल्यावर सर्वात वरील स्वच्छ मीठाचा थर लाकडी फावडयाच्या साहाय्याने काढला जातो,

उपयोग :-

सर्वात वरील थर हा शुद्ध व पूर्णपणे सफेद मीठाचा असतो, हे मीठ खाण्यासाठी वापरले जाते. हे मीठ खड्यांचे म्हणजेच मोठ्या आकाराचे स्फटिक अशा स्वरूपात असते, ज्याला आपण खडे किंवा जाडे मीठ म्हणतो. असे हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवलेले, कुठलीही कृत्रिम प्रक्रिया न केलेले हे मीठ खाण्यासाठी व आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. नंतर खालील थराचे मीठ परत लाकडी लाकडी फावडयाच्या साहाय्याने काढले जाते. हे मीठ इथर ठिकाणी वापरले जाते. या मीठाचा वापर electricity च्या earthing साठी, विविध प्रकारच्या कारखान्यांमध्ये, आइस फॅक्ट्रीज मध्ये वापरले जाते.

आता प्रश्न पडतो कि हे समुद्राचे पाणी जर कुठल्याही किनाऱ्याला लागून आटवले तर मीठ बनू शकते का ? तर नाही. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनणे हे केवळ त्या जमिनीमध्ये असलेल्या तत्वांमध्ये अवलंबून असते. अशी तत्वे फक्त काही ठिकाणीच आढळतात, आणि हि तत्वे पाण्यापासून मीठ तयार करतात. हे पांढरे शुभ्र चकाकणारे मीठ पहिले कि मूठभर मीठ हातात उचलावेसे नक्की वाटते. असे हे पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने बनलेले व कुठल्याही प्रकारची कृत्रिम प्रक्रिया न केले आरोग्यपूर्ण मीठ नक्की वापरा आणि निरोगी रहा.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password