Search
Sign In

वाल

वाल

कोकणातील कडवे वाल, अर्थात बिरडे. कडधान्यातील सर्वांचा आवडता प्रकार.  वालाचे विविध खाद्यपदार्थ कोकणात फार प्रसिद्ध आहेत.

राज्यामध्ये सर्वात जास्त वालाचे पीक हे रायगड जिल्यामध्ये घेतले जाते. अलिबाग व परिसरात मोठ्या प्रमाणात वालाचे पीक घेतले जाते. हे रब्बी पीक असून भाताचे पीक काढल्यानंतर जमीन दोन तीन वेळा नांगरून पेरणी करतात. दसरा दिवाळी झाली कि भात कापणी होते व नंतर शेतात ओलावा असताना परत ट्रॅक्टर फिरवला जातो व जमीन भुसभुशीत केली जाते व त्यातच वाल व इतर कडधान्य पेरली जातात. जमिनीतील ओलावा व उब यावर हि कडधान्ये उगवतात व मोठी होतात. ढगाळ व थंड हवामान या पिकास मानवते.  वाल तयार व्हायला साधारणतः मार्च एप्रिल उजाडतो. व नंतर हे वाल बाजारात विकायला येतात. येथे बऱ्याच ठिकाणी आठवडा व पंधरवडा बाजार भरतो जेथे सर्व कडधान्य विकायला असतात. कडव्या वालाची चव हि घाटावरच्या पावट्यापेक्षा वेगळी असते.

येथे घराघरात वाल वर्षभरासाठी साठवून ठेवले जातात, व जरुरतीप्रमाणे वापरले जातात. काही जण या वालांना लाल माती लावून साठवतात जेणेकरून त्यांना कीड लागू नये.

पोपटी –  वाल हे पोपटीमधील एक महत्वाचा भाग, पोपटी साधारणतः वाल तयार झाल्यावर लावली जाते, वालाच्या अखंड कच्या शेंगा पोपटीमध्ये वापरल्या जातात. सोबत कांदे बटाटे सुद्धा वापरले जातात. पोपटीमधील वालाच्या शेंगां फारच चवदार लागतात.

असे हे कोकणातील प्रसिद्ध कडवे वाल. अलिबागला भेट दिल्यावर घ्यायला विसरू नका

  • 249
  • Farming
  • Comments Off on वाल

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password